मुंबई : ‘भिरकीट’ या चित्रपटातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. या गाण्याला उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांचा ठसकेदार आवाज असून मंगेश कांगणे यांनी हे गाणं लिहिले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, या चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणीही पहायला मिळणार आहे. क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मीती सुरेश जामतराज ओसवाल व भाग्यवंती ओसवाल यांची असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.
छायाचित्रण मीर व संकलन फैजल महाडिक यांचे आहे. शैल व प्रितेश या जोडीचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.