50 लाख रुपयांची उपकरणे प्रस्तावित
अंबाजोगाई : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत, यासाठी आमदार संजय दौंड यांच्या आमदार निधीतून 36 लाख रुपयांचे वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही उपकरणे आज दिनांक 31 मे रोजी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे गोरगरिब जनतेसाठी वरदान ठरले आहे. अंबाजोगाईसह आसपासच्या जिल्हृयातून या रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे रुग्णसेवा मिळाली, यासाठी ‘स्वाराती’ चे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी मेहनत घेत असतात.
त्यासोबतच लोकप्रतिनिधींही रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी चांगल्या दर्जाची वैद्यकीय उपकरणे असावीत, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विधान परिषद सदस्य आमदार संजय दौंड यांच्या आमदार निधीतून 36 लाख रुपयांचे वैद्यकीय उपकरणे ‘स्वाराती’ ला उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या उपकरणात मल्टीप्रा मॉनिटर – 4, सिरींज इन्फ्युजन पंप – 19, रेडियंट हिट वॉर्मर – 10, पीपीई कीटस् यासह आवश्यक सामुग्रींचा समावेश आहे. आमदार दौंड यांच्या निधीतून आणखी 50 लाख रुपयांची उपकरणे प्रस्तावित आहेत.
यावेळी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे, विलास सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मुडेगावकर, अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. धपाटे, डॉ. राकेश जाधव, डॉ. नितीन चाटे, अधिसेविका भताने यांच्यासह रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.