राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव
अंबाजोगाई : अतिशय अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या तालुक्यातील धानोरा बु. सेवा सहकारी सोसायटीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी – शेतमजूर विकास पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. सर्वच्या सर्व म्हणजे 13 जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव झाला आहे. पंकजा मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
धानोरा सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. परंतू, आज आलेल्या निकालानंतर या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी – शेतमजूर विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला.
विजयी उमेदवारांत सर्वश्री जगन्नाथ आदनाक, शेषेराव आदनाक, बालासाहेब चिवडे, मदन पाटील, शेषेराव पाटील, श्रीनिवास मुंदडा, अशोक सोमवंशी, भाऊसाहेब सोमवंशी, सुधाकर काळूंके, अर्चना आदनाक, सुनंदाबाई सुर्यवंशी, भारत चिवडे, शिवकुमार पांचाळ यांचा समावेश आहे.
पॅनलचे प्रमुख शेषेराव पाटील आणि सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पॅनलच्या विजयासाठी उप सरपंच मेघराज सोमवंशी, दत्तात्रय आदनाक, बालासाहेब सोमवंशी, पंडित सोमवंशी, भाऊसाहेब पाटील, भगवान चिवडे, श्रीकांत फोलाणे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.