अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक तथा प्रमुख इंद्रजीत रामदास भगत यांची राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) यांच्या अकाउंट आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022 – 2023 करिता नव्याने सुरू होणाऱ्या सत्रासाठी अकाउंट व स्टॅटिस्टिक या विषयाचे बी. काॅम. प्रथम व एम. कॉम. प्रथम वर्ष अभ्यासक्रम तयार करण्याच्या मंडळावर त्यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील अग्रगण्य वाणिज्य महाविद्यालयातील अभ्यासक्रम मंडळावर झालेल्या त्यांच्या नियुक्तीबद्दल प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ. अनंत मरकाळे, डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. दिलिप भिसे, ग्रंथपाल सुनील भोसले व प्रा. जगन्नाथ तत्तापुरे, डॉ. चौधरी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.