अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ना. धनंजय मुंडेंनी आणला कोटींचा निधी

ग्रामविकासच्या 2515 योजनेतून कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान

अंबाजोगाई : परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हास्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता ग्रामविकास विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे.

ग्रामविकास विभागाकडून 2515 योजनेअंतर्गत मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील गावांमधील विविध विकासकामांसाठी जवळपास 1 कोटी 68 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील खालील गावांत होणार रस्ता

तडोळा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, राडी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुडेगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सातेफळ येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सेलुअंबा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नांदगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, बर्दापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 8 लक्ष, धायगुडा पिंपळा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिता येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जवळगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, अंबलवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तळणी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तेलघणा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, पूस येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, घाटनांदूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 8 लक्ष, चौथेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नवाबवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, घोलपवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिरवली आपेट येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिरवली बावणे येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, चंदनवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, साळुंकवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वालेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वाकडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुर्ती ग्रा.पं. अंतर्गत शिवारातील घरासमोर पथदिवे बसवणे 4 लक्ष, बाभळगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कुसळवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, खापरटोन येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सौंदना येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुरकूटवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, बाभळगाव अंतर्गत कांदेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कातकरवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, भारज येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सुगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, राडीतांडा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 7 लक्ष, भतानवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, धसवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, दरडवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जोडवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, हडबेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परळी मतदारसंघासाठी भरीव निधी दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.