‘सिल्वर ओक’ : भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 9 एप्रिलला शनिवारी निषेध करण्यात आला.

येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फीत लावून निषेध करत, घोषणाबाजी करत त्यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलन शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने होत असतात. शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याची कृती राजकारणाने प्रेरित आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, गोविंदराव देशमुख, नगरसेवक बबन लोमटे, तालुकाध्यक्ष ताराचंद ‌शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.