17 कोटी 32 लक्ष रुपयांची 0.3 टेस्ला ‘एमआरआय’ मशीन सुरु होण्याचा मार्ग मोकळा

जिल्हाधिकारी कार्यालय व महाविद्यालयीन प्रशासनाने सोडवला विद्युत बीलाचा तिडा

3. 5 कोटींची थकबाकी केली बेबाक !

सार्वजनिक बांधकाम व विद्युत मंडळाकडे पाठपुरावा सुरू

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात नोव्हेंबर 2021 मध्ये आलेली 17. 5 कोटी रुपयांची 0.3 टेस्ला ‘एमआरआय’ मशीन सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या महिन्याभरात या मशीनचे इन्सटॉलेशन पुर्ण होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली अत्याधुनिक बनावटीची 0.3 टेस्ला ‘एमआरआय’ मशीन 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात रुग्णालय परीसरात दाखल झाली. या ‘एमआरआय’ मशीनसाठी सीटी स्कॅन युनीट शेजारी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत इमारत उभी करण्यात आली असून मशीन फिटींगचे काम पुर्ण करुन घेण्यात आले. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाकडे 3.5 कोटींचे वीजबील थकीत असल्यामुळे वीज मंडळाने सदरील मशीन सुरू करण्यासाठी 400 केव्ही वॅटचा विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. या संदर्भात वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर थकबाकी भरल्याशिवाय हा 400 केव्हीचा विद्युत पुरवठा सुरु करता येणार नसल्याचे त्यांनी निक्षुन सांगितले होते.

‘एमआरआय’ मशीन सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली 3.5 कोटींची वीज थकबाकी भरण्यासाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत मागणी केली होती. या सर्व प्रयत्नाला पालकमंत्री ना‌ धनंजय मुंडे व विधान परिषदेचे सदस्य आ. संजय दौंड यांनी मोठा हातभार लावला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीनुसार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाकडे उपलब्ध झालेल्या निधीतून या बीलाची मोठी रक्कम वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने भरण्यात आली व अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयातून थकीत वीज बीलांसाठी 1 कोटी 92 लाख रुपयांच्या निधीची मदत केली व संपुर्ण वीजबील थकबाकी बेबाक केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयाकडे थकबाकी असलेले संपुर्ण विद्युत बील भरले असल्यामुळे आता एमआरआय मशीन सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरील मशीन सुरु करण्यासाठी आता चनई सबस्टेशनमधुन सरळ 400 केव्ही वॅट व्होलटेज वाढवण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ‘एमआरआय’ मशीनला विद्युत प्रवाहाची जोडणी करुन दिली की ही मशीन सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

वीज जोडणीचा मार्ग मोकळा..‌!

वैद्यकीय महाविद्यालयाकडे थकबाकी असलेले संपुर्ण विद्युत बील भरले असल्यामुळे आता एम आर आय मशीन सुरु करण्याचा मोकळा झाला आहे. सदरील मशीन सुरु करण्यासाठी आता चनई सब स्टेशन मधुन सरळ 400 केव्ही वॅट व्होलटेज वाढवण्यात आल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एमआरआय मशीनला विद्युत प्रवाहाची जोडणी करुन दिली की ही मशीन सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मशीन फिटींगचे काम पुर्ण : इंन्स्टॉलेशनसाठी एक महिना 

‘एमआरआय’ मशीन फिटींगचे सर्व काम पुर्ण झाले असून सदरील मशीनसाठी 400 केव्ही वॅटचा विद्युत पुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर संपुर्ण युनीटमधील यंत्रसामुग्रीला विद्युत पुरवठा सुरळीत करुन मशीन इंन्स्टॉलेशनसाठी एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती या मशीन उभारणीचे काम करणाऱ्या फिलीप्स कंपनीचे प्रॉजेक्ट मॅनेजर यांनी दिली. – यशपाल चव्हाण, प्रॉजेक्ट मॅनेजर, फिलिप्स कंपनी.

ना. मुंडे व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा   

‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली अत्याधुनिक बनावटीची 0.3 टेस्ला ‘एमआरआय’ मशीन उभारणीचे काम पुर्ण झाले असून सदरील मशीनच्या विद्युत जोडणीचे काम पुर्ण होवून संबंधित कंपनीच्या इंजिनिअरने या मशीनचे इंन्सटॉलेशन पुर्ण केल्यानंतर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या एमआरआय मशीनचा लोकार्पण सोहळा घेण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.