सुप्रीम कोर्टात देण्यात आले आव्हान
मुंबई : नगरपरिषद – महानगरपालिका यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ओबीसी आरक्षण आणि महानगरपालिका निवडणूकीबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. त्यानुसार या निवडणुका मे – जूनमध्ये होणार नाहीत अशीच चिन्हं दिसून येत आहेत.
ओबीसी आरक्षण आणि महानगरपालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आणि विरोधी पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावर आधारित ओबीसी आरक्षण विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले.
याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी 21 एप्रिलला होणार असल्याने मे – जून महिन्यात तरी सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत असे चित्र आहे.