शेपवाडीत भरदिवसा पुजाऱ्याचा खून : परिसरात खळबळ

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेपवाडी गावात खळबळजनक घटना घडली आहे. गावातील हनुमान मंदीराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक (वय 50) यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शेपवाडी गावातील सर्व पुजा – अर्चा संतोष पाठक यांच्याकडे असतात. प्राप्त माहितीनुसार आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले. 

ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले. परंतू, तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.