अंबाजोगाई : शहरात ‘मोदी ज्वेलर्स’ या भव्य अशा वातानुकूलित दालनाचे उद्घाटन संत – महंतांच्या उपस्थितीत आज दिनांक 25 मार्चला झाले. नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व त्यांचे बंधू उद्योजक भूषण, सुरेश व संकेत राजकिशोर मोदी यांनी सोने – चांदीच्या व्यवसायात नुकतेच पदार्पण केले. ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडी, ह.भ.प. वेद शास्त्री सं. पंडितराज, गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी (काशी संस्थान), ह.भ.प. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प. किसन महाराज पवार, ह.भ.प. महादेव बोराडे महाराज, मौलाना अकबर इशादी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘मोदी ज्वेलर्स’ या सोन्या – चांदीच्या भव्य वातानुकूलित दालनाचा शुभारंभ करण्यात आला.
या दालनात हॉलमार्कचे 22 व 24 कॅरेटचे अतिशय शुद्ध प्रतीचे आणि खात्रीपूर्वक असे अलंकार विविध प्रकारात विविध डिझाइनमध्ये एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. यामध्ये विशेषतः टेम्पल हार, मंगळसूत्रांच्या विविध प्रकारच्या डिझाइन, नेकलेस, अंगठया तसेच चांदीच्या आकर्षक मुर्त्या, पायल व जोडवी यांच्या देखील असंख्य व्हरायटीज ‘मोदी ज्वेलर्स’ च्या दालनात खरेदी करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व दागिने हे अद्यावत मशीनरीद्वारे तपासून शुद्ध असल्याची खात्री करूनच ग्राहकांपर्यंत पोचविले जातं आहेत.
या सुवर्ण दालनाच्या शुभारंभाप्रसंगी सुवर्णसंचय योजनेच्या माध्यमातून ग्राहकांचे सुवर्ण खरेदीचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळणार आहे. यात मासिक 5000 च्या पुढील सभासदास 5 ग्रॅमचे सिल्व्हर कॉईन मोफत मिळणार आहे. तसेच जेवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी कराल तेवढ्याच वजनाचे चांदीचे दागिने मोफत मिळवाल, अशीही योजना राबविल्या जात आहे. एक लाख रुपयांच्या सोने खरेदीवर 2100 रुपयाचे गिफ्ट व्हाऊचर मिळणार असल्याची माहिती मोदी बंधू यांनी दिली.
मोदी बंधू यांच्या सुवर्ण व्यवसायास शुभेच्छा देण्यासाठी विविध संत – महंतासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. यात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, बीड जिल्हा परिषदेचे शिवाजी सिरसाट, उद्धव बापू आपेगावकर, रमेश आडसकर, पुण्याचे संतोष कुंकुलोळ, धारूर येथील अजयसिंह दिखत, बीड येथील महादेव धांडे यांच्यासह डॉक्टर्स, वकील, व्यापारी, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व मोदी परिवारावर प्रेम करणारी असंख्य मंडळी यांनी हजेरी लावली.