सोने – चांदीचे दालन : ‘मोदी ज्वेलर्स’ चा 25 मार्चला भव्य शुभारंभ


ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा

अंबाजोगाई : नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व त्यांचे बंधू सुप्रसिद्ध उद्योजक भूषण, सुरेश व संकेत मोदी हे सोने – चांदीच्या व्यवसायात पदार्पण करत आहेत. उद्या 25 मार्चला शुक्रवारी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडी, ह. भ. प. वेद शास्त्री सं. पंडितराज, गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी (काशी संस्थान), ह.भ.प. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, ह.भ.प .अर्जुन महाराज लाड, ह.भ.प. किसन महाराज पवार, ह.भ.प. महादेव बोराडे महाराज, मौलाना अकबर इशादी यांच्या पावनहस्ते ‘मोदी ज्वेलर्स’ या सोन्या – चांदीच्या भव्य दालनाचा शुभारंभ होणार आहे.

मोदी बंधू यांनी यापूर्वी राजकारणासोबतच राज हॉटेल, राज मेडीकल, राज पेट्रोलियम व बांधकाम व्यवसायात काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांचे पाऊल सुवर्ण व्यवसायात पडत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ते ग्राहकांना अतिशय शुद्ध असे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची दागिने देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘ग्राहकांचे समाधान हेच आमचे समाधान’ हे ब्रीद घेऊन आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा आपण करत असल्याची माहिती मोदी बंधूनी दिली. तसेच येणाऱ्या ग्राहकांना सोने खरेदीवर आकर्षक सवलत व गिफ्ट कुपण देण्यात येणार आहे.            

अंबाजोगाईकरांना अद्यावत असे नाविन्यपूर्ण डिझाइन, सुंदर व सुबक कलाकृती असलेली सोने – चांदीची आभूषणे आता माफक दरात आपल्या  शहरातच उपलब्ध होणार असल्याने शहरवासियांचा पैसा, वेळ याची देखील बचत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अंबाजोगाईकरांची शुद्ध व हॉलमार्कयुक्त सुवर्ण आभूषणं खरेदी करून वापरण्यासाठीची तृष्णा पूर्ण करण्याच्या पवित्र उद्देशाने सुरू करत असलेल्या या नाविन्यपूर्ण सुवर्ण दालनाचा लाभ अवश्य घ्यावा व पुनः एकदा आम्हास अंबाजोगाईकरांनी सेवेची संधी द्यावी, असे आवाहन राजकिशोर, भूषण, सुरेश आणि संकेत मोदी यांनी केले आहे.