घाटनांदूर येथे रेल्वे रुळावर आढळला मृतदेह : पोलीस दाखल

अंबाजोगाई : घाटनांदूर येथे रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती आज दिनांक 22 मार्चला समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. सदरिल मृतदेहाची ओळख पटली असून मृत झालेली व्यक्ती घाटनांदूर येथील रहिवासी आहे.  

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील रहिवासी बालासाहेब योगा मिसाळ (वय 55) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बालासाहेब हे रात्री 8 वाजल्यापासून घरी आले नव्हते. मंगळवारी सकाळी रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळला‌. ही माहिती गावात समजताच प्रेताची ओळख पटली आहे. बालासाहेब यांनी आत्महत्या केली ? का रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला ? याची माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, बालासाहेब मिसाळ हे बँड वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र या घटनेमुळे बालासाहेब यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे.