अंबाजोगाई : ‘इनरव्हील’ क्लबच्या वतीने अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे जाऊन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर – ट्रॉल्यांना रेडियम रिफ्लेक्टर बसवण्यात आले. या उपक्रमात क्लबच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा म्हणाल्या की, बऱ्याचदा ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात इतर वाहनांना त्या ट्रॉल्या दिसत नाहीत आणि अपघात घडतात. हे लक्षात घेऊन ‘इनरव्हील’ क्लब तर्फे 50 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर बसवण्यात येत आहेत. यामुळे 4 अपघात टळले व एका व्यक्तीचे प्राण वाचले तरी खूप मोठी गोष्ट होईल, असे चरखा यांनी सांगितले.
या प्रसंगी अध्यक्षा अंजली चरखा, कारखान्याचे रवि देशमुख, सुरक्षा अधिकारी वाघमारे, क्लबच्या सचिव मेघना मोहिते, सोनाली कर्नावट, रेखा शितोळे, कल्पना शिंदे, वैजयंती टाकळकर ह्या उपस्थित होत्या.