नविन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन
अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीची अंबाजोगाई तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी खाजामिया पठाण यांची तर शहराध्यक्षपदी गोविंद मस्के यांची निवड करण्यात आली आहे. नविन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये शैलेश कांबळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी खाजामिया पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर शहराध्यक्षपदी गोविंद मस्के यांची निवड करण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुका कार्यकारिणीत महासचिव नितीन सरवदे, राहुल कासारे, सुभाष चोपडे, मेघराज कांबळे, उपाध्यक्ष अॅड. सुभाष जाधव, सागर ओगले, प्रसिद्धी प्रमुख सतीश सोनवणे, मुन्ना वाघमारे नांदडीकर, प्रवक्ता रहमान पटेल (धानोरा) यांच्यासह आदींची निवड झाली असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.