रंगांचा उत्सव असणाऱ्या होळी – धुलीवंदनाच्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा
बीड : समाजातील समाज विघातक प्रवृत्ती या होलिकेमध्ये दहन व्हाव्यात व समाजात शांती प्रस्थापित व्हावी, होळीच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सप्तरंगप्रमाणे समृद्धी, सुख व शांती नांदावी, असा संदेश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी होळीच्या पूर्वसंध्येला दिला आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रंगांचा उत्सव असलेल्या होळी व धुलीवंदनाच्या सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील दोन वर्षात कोविड निर्बंधांमुळे होळी व धुलिवंदनासह विविध सण – उत्सव घरच्या घरीच साजरे करावे लागले, यावर्षी मात्र निर्बंध कमी झाले असल्याने एक वेगळाच उत्साह होळीच्या निमित्ताने दिसून येत आहे. मात्र, तरीही कुठेही वृक्ष तोड होणार नाही व पर्यावरणाची नासधूस टाळत इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन होळी साजरी करावी. तसेच धुलीवंदनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.