‘झुंड’ ने जिंकल प्रेक्षकांचं मन : सिनेमानं चांगलीच घेतली पकड

मुंबई : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ 4 मार्चला प्रदर्शित झाला. सिनेमाची सुरूवात थोडी संथ गतीने झाली. मात्र, आता या सिनेमाने चांगलीच पकड घेतली आहे. वास्तविक दर्शन या सिनेमातून घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या सिनेमाने चांगलीच पकड पकडली आहे. 

‘झुंड’ सिनेमाने पहिल्या दिवशी 1 करोड रुपयांचा गल्ला कमविला. दुसऱ्या दिवशी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सिनेमाने 1.50 करोड रुपये कमावले आहेत. तर सिनेमाची आतापर्यंत 2.5 करोड रुपयांपर्यंत कमाई झाली आहे. 

बॉक्स ऑफिस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारीही चित्रपटाची कमाई चांगली होती. तिसर्‍या दिवशीही या चित्रपटाने तब्बल 1.50 ते 2 कोटींचा व्यवसाय केला. 

विशेष म्हणजे या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका लोकांना आवडली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात क्रीडा प्रशिक्षक विजय बोराडे म्हणून वेगळी छाप सोडली आहे. ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावरून हा चित्रपट प्रेरित आहे.

दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी ‘झुंड’ ची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. इतकंच नाही तर तो या चित्रपटातही अभिनय करताना दिसला आहे. यापूर्वी 2016 मध्ये ऑनर किलिंगवर आधारित ‘सैराट’ हा मराठी चित्रपटही नागराज पोपटराव मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता.