विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘बालझुंबड’ सारखी व्यासपीठं निर्माण होणे काळाची गरज – पोलिस अधीक्षक कविता नेरकर

‘बालझुंबड – 2022’ चा बक्षीस वितरण सोहळा थाटात पडला पार

अंबाजोगाई : प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळ शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबवित असलेल्या ‘बालझुंबड’ या सारखे अनेक व्यासपीठ निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. त्या ‘बालझुंबड – 2022’ च्या विजेत्या स्पर्धकांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होत्या. 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन लोमटे, दिनकर जोशी, तानाजी देशमुख, ताराचंद शिंदे, विनोद निकम, डॉ. नितीन चाटे, डॉ .राहुल धाकडे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. सारिका शिंदे, डॉ. सुनीता धुळे, डॉ. अर्चना थोरात, पत्रकार अविनाश मुडेगावकर, जगन सरवदे, महादेव गोरे, प्रशांत बर्दापूरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण आगोदर ‘कैदी नंबर 312’ हे नाटक  सादर करण्यात आले.

यावेळी राजकिशोर मोदी यांनी ‘बालझुंबड’ विषयी बोलतांना सांगितले की, प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गेली 22 वर्षांपासून ‘बालझुंबड’ हा उपक्रम अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. या उपक्रमाला तालुक्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व पालक अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवतात, याचा मंडळाला अभिमान असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मागच्या काही काळापासून मुले ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली संपूर्णपणे मोबाईलमय झाली आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना काही काळ का होईना प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने मोबाइलच्या बाहेर काढले, त्याबद्दल सर्व पालकांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे त्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले. लहानपण हे निरागस असते. मोठ्यांना देखील लहानपण जगता आले पाहिजे. लहान मुलांच्या मनावर अमुक गोष्टींसाठी दडपण देऊ नये, मुलं आपापला मार्ग शोधतात. त्यांना चांगला माणूस होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. तसेच त्यांना मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे, असे नेरकर यांनी भाषणात नमुद केले. 

बक्षीस पात्रं शाळेमध्ये योगेश्वरी विद्यालय, सृजन प्राथमिक विद्यालय, वसंतराव काळे पब्लिक स्कुल, सिनर्जी नॅशनल स्कुल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल, संभाजीराजे ग्लोबल स्कुल, खोलेश्वर विद्यालय, विवेकानंद बालविद्या मंदिर, जिजाऊ इंग्लिश स्कुल,न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, जोधाप्रसाद मोदी विद्यालय, घाट नागनाथ विद्यालय या विजेत्या शाळा व विद्यार्थी यांचे अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी केले.  

कार्यक्रमाचे बहारदार संचालन रचना परदेशी हिने केले. ‘बालझुंबड – 2022’ चा बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत कांबळे, आनंद टाकळकर, विनायक मुंजे, सुनिल व्यवहारे, विजय रापतवार, सचिन जाधव, विशाल जगताप यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.