धनुषसाठी आयोजित केले होते स्पेशल स्क्रिनिंग
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्याच्या टीमचा ‘झुंड’ हा चित्रपट उद्या 4 मार्चला प्रदर्शित होतोय. अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने पाहिला होता. आता अभिनेता धनुषसाठी देखील या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर धनुषनं चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.
‘झुंड’ पाहिल्यानंतर धनुष म्हणाला, मला कळत नाहीये मी काय बोलू, खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटातील संदेश हा सर्वांनी ऐकला पाहिजे. मी या चित्रपटातील हजारापेक्षा जास्त चांगल्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो. चित्रपट पाहण्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. हा मास्टरपीस आहे. हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधणार आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मला आनंद झाला.
चित्रपटात काम केलेल्या मुलांनी माझे मन जिंकल आहे. अमिताभ बच्चन तुम्ही खूपच छान काम केले आहे. पूर्ण टीमनं चांगले काम केले आहे. नागराजचे मी आभार मानतो, त्याने एवढा चांगला चित्रपट तयार केला. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.
‘झुंड’ हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजनं केली आहे.