अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव (युवक) अक्षय भूंबे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवस्वराज्य रक्षक बहुजन सेना यांच्या वतीने दिला जाणारा’ निस्वार्थी कार्यकर्ता’ पुरस्कार नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भूंबे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

अक्षय भूंबे यांनी गायरान धारकांसाठी आंदोलन, कोविड काळात रक्तदान शिबीर, मोफत ई – श्रमकार्ड नोंदणी, कोविड काळात गरजूंना मोफत राशन किट वाटप असे अनेक लोकहीत उपक्रम राबविले. भूंबे यांच्या कायार्ची दखल घेऊन त्यांना शिवस्वराज्य रक्षक बहुजन सेना यांच्या वतीने ‘निस्वार्थी कार्यकर्ता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.