मोरेवाडीत स्विफ्ट कार पलटी : चालकाचा मृत्यू

अंबाजोगाई : राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांचे संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा बसला असून मोरेवाडी परिसरात स्विफ्ट कार पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) मध्यरात्री घडली आहे.

अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गातंर्गत कामे सुरू असून‌ बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. या रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मात्र वाहन‌ं चालविताना मोठा त्रास सहन‌ करावा लागत‌ आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण चौकातील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. 

सोमवारी मध्यरात्री मोरेवाडी येथील यशवंतराव चव्हाण चौकाजवळच असलेल्या सिमेंट नालीला धडक देऊन स्विफ्ट कार पलटी झाली. या अपघातात कारच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. कारचालकाचे नाव पवार असल्याची माहिती मिळाली असून तो‌ मोरेवाडी परिसरातीलच रहिवासी आहे.