ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई : येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक ‘दिव्य लोकप्रभा’ चे उपसंपादक सुदर्शन रापतवार यांना केज झुंझार पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    

वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केज झुंझार पत्रकार संघाच्या वतीने नुकताच जाहीर झालेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार 20 फेब्रुवारीला रापतवार यांना केज येथील शिक्षक भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास जुन्या पिढीतील राजकारणात सक्रिय असलेले स्वच्छ आणि निश्कलंक चारित्र्याचे सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राजेसाहेब देशमुख, माझे स्नेही मित्र अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर, येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, युवानेते अक्षय मुंदडा, केज शहराचे उमलते नेतृत्व हारुण इनामदार, केज नगरपंचायतीच्या अध्यक्षा सिताताई बनसोड, केज बाजार समितीचे माजी चेअरमन अंकुशराव इंगळे, रमाकांत मुंडे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, भाई मोहन गुंड, संपादक परमेश्वर गित्ते यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक झुंझार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय हंडिबाग यांनी तर सूत्रसंचालन गोविंद शिनगारे यांनी केले. आभार अध्यक्ष दशरथ चौरे यांनी मानले. कार्यक्रमास केज शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.