घाटनांदुर : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे निर्भीड व निपक्ष असे राज्यकर्ते होते. त्यांनी जनकल्याणासाठी आपल्या आयुष्यामध्ये असंख्य लढाया जिंकून रयतेचे रक्षण केले, असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव सोहळा साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक शाळेतील पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी अजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस रणजित लोमटे, शिवाजी सिरसाठ, सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, दिलीप गित्ते, महेश गारठे, पवन दरगड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, नेताजी देशमुख, दत्ता जाधव, उत्सव जाधव, लखन पतंगे, अक्षय जाधव, सुनिल गरड, धैर्यशील जाधव, सचिन मोरे, विनय जाधव, प्रसाद कदम, चेतन छानवाळ, विशाल जाधव, वचीष्ट जाधव, सिद्धेश्वर जाधव, अजिंक्य जाधव यांच्यासह असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.