अंबाजोगाईतील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात सराफांची घेतली बैठक
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सराफांशी साधला संवाद
अंबाजोगाई : अंबाजोगाईत होणाऱ्या वाढत्या चोऱ्या व इतर घडणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता शहरातील सोनार, सराफ व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचीही उपस्थिती होती.
अंबाजोगाई शहरातील अप्रिय घटना किंवा चोरी टाळ्ण्यासाठी व्यापारी बांधवानी काय करायला पाहिजे, यासाठी अपर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. शहरात चोरी किंवा कांही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच्या उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन करतानां नेरकर म्हणाल्या, शहरात मोठ्या व्यावसायिकांकडे सीसीटीव्ही कॅमरे आहेत. मात्र, त्या कॅमेऱ्यात केवळ दुकानाचा परिसर दिसतो, रस्त्यावरील हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडली तर तपासकामी त्या कॅमेऱ्यात रस्त्यांवरील कांहीच दिसत नाही.
व्यावसायिक छोठा असो की मोठा, प्रत्येकांनी आपल्या दुकानात व संपूर्ण रस्त्यांवरील हालचाल दिसेल, असे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे काळाची गरजेचे आहे. दुकानाच्या सुरक्षितेसाठी कॅमऱ्याबरोबरच अलाराम बसवून घेणे गरजेचे आहे. रात्री पोलीसांची गस्त असते, पण दुकानाच्या शटरला कोणी उघडण्याचा प्रयत्न केला तर आलारामच्या आवाजाने होणारा अनर्थ टाळता येऊ शकतो. पोलीस प्रशासन व्यापाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करत असते. पण व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी समजून कॅमेरा, आलारामचा वापर केला तर अनर्थ टाळला जाऊ शकतो.
नेरकर पुढे म्हणाल्या की, अनोळखी व्यक्तीकडून आपण सोने खरेदी करू नये. कोणी गुंड – बदमाश ब्लॅकमेल करत असतील तर थेट पोलीसांशी संपर्क करा, आम्ही आपल्याला सर्वोतोपरी मदत करू, असे, आश्वासन त्यांनी यावेळी व्यापाऱ्यानां दिले.
परळी, केज, धारूर, माजलगाव आदी तालुक्यांतील व्यापाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन लवकरच करणार आहोत. राठौर यांच्या चोरीचा तपासकामी संपुर्ण पोलीस यंत्रना कामाला लागली आहे. चोर लवकरच ताब्यात येतील, त्या दिशेने पोलीस यंत्रना प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर म्हणाल्या. ज्या व्यापाऱ्यांकडे तिजोरी नाहीत, त्यांनी तिजोरी घेतली तर चोरीसारखा अनर्थ टाळला जाऊ शकतो. जे व्यापारी दररोज आपल्या ऐवजाची ने – आण घरी करतात. त्या व्यापाऱ्यांसोबत एखादी व्यक्ती असणे गरजेचे आहे.
शहर पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनावर अधिकचा ताण येतो. शहरात पोलीसांची रात्रीची गस्त आसते. आपल्याला कांही हालचाल दिसत असेल किंवा कोणी संशयीत, अनोळखी व्यक्ती असेल तर पोलीस प्रशासनास या बाबत तात्तकाळ माहिती देण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी व्यापाऱ्यांना केले. यावेळी बहुसंख्य सोनार, सराफ व्यापारी, व्यापारी संघटनेचे व रोटरी कल्बचे पदाधिकारी उपस्थित होते.