मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी – 2022 ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. 10 फेब्रुवारी, 2022 ते 31 मार्च, 20022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.