अंबाजोगाई : येथील डॉ. क्रांती महादेव सिरसाट या वैद्यकीय पिजी प्रवेश पूर्व परीक्षेत मागासवर्गीय प्रवर्गातून देशात अकराव्या तर महाराष्ट्रातून पहिल्या आल्या आहेत. केंद्र शासनाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. ‘मेडिसीन’ मध्ये पीजी करण्यासाठी डॉ. क्रांती यांची निवड झाली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर पदवीला (पीजी) प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश पूर्व नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये डॉ. क्रांती यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला तर देशात अकरावा क्रमांक मिळविला आहे.
डॉ. क्रांती यांनी पिजीसाठी ‘मेडिसिन’ हा विषय निवडला आहे. डॉ. क्रांती यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.