टीम AM : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चा वाढदिवस. परिणीती चोप्रा चा जन्म. 22 ऑक्टोबर 1988 ला अंबाला, येथे झाला. प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण खरे सांगायचे तर बॉलिवूडमध्ये येण्याचा परिणीतीचा कुठलाही इरादा नव्हता. हिरोईन होण्याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. चेहऱ्यावर मेकअप थोपणे परिणीतीला जराही आवडायचे नाही आणि त्यामुळेच हिरोईन बनण्याची तिची इच्छा नव्हती. इन्हवेस्टमेंट बँकिंगमध्ये करिअर करण्याचे परिणीतीने आधीपासूनच ठरवून टाकले होते.
आपल्या याच ध्यासापोटी तिने मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. येथे परीने बिझनेस, फायनान्स व इकॉनॉमिक्समध्ये ऑनर डिग्री घेतली. पण 2009 मध्ये परिणीतीला रिलेशनमुळे भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर परिणीतीला यशराज बॅनरमध्ये पब्लिक रिलेशन कन्सलटन्ट म्हणून नोकरी मिळाली. पण ही नोकरीच परिणीतीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
प्रियांका चोप्रा तिच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटासाठी तयारी करत होती. बहिणीची ही तयारी पाहून परिणीतीच्या मनातही अभिनयाविषयी रूची निर्माण झाली. यानंतर लगेच परिणीतीने अभिनयाचे धडे गिरवले. परिणीतीने 2011 सालच्या लेडीज vs रिक्की बहल ह्या चित्रपटामध्ये सह – नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2012 साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी परिणीतीला विशेष उल्लेख हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
परिणीतीची दुसरी चुलत बहिण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्रा नावाजलेली अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत परिणीतीचे ‘इशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत-ए-इश्क’ हे सिनेमे रिलीज झाले आहेत. बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक ‘सायना’ या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट काळापूर्वी सिनेमाघरात प्रदर्शित झाला होता. तसेच डिजिटल माध्यमात रिलीज झाला आहे.
शब्दांकन : संजीव वेलणकर