ढाई किलो का हाथ…सनी देओल : ‘बेताब’ पासून झाली करिअरची सुरुवात

टीम AM : ‘ढाई किलो का हाथ जब पडता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है’ या डायलॉगने प्रसिद्ध झालेले सनी देओल यांचा वाढदिवस. सनी देओल यांचा जन्म. 19 ऑक्टोबर 1957 ला झाला. सनी देओल यांचे मूळ नाव अजयसिंग देओल. सनी देओल यांनी साहसपट, ॲक्शनपट यात कामे केली.

सनी देओल यांच्या करिअरची सुरुवात 1983 साली आलेल्या ‘बेताब’ चित्रपटातून झाली. सनी देओल एका चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी रुपये चार्ज करतात. अभिनयासोबतच सनी देओल यांचे ‘विजेता फिल्म्स’ या नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. यामधून त्याने ‘दिल्लगी’ आणि ‘घायल वंस अगेन’ सारखे चित्रपट बनवले आहेत. 

सनी देओल चित्रपटांसोबतच अनेक जाहिराती करतात. सनी लक्स कोजी, फॉर्मट्रॅक ट्रॅक्टर, बीकेटी टायर सारख्या कंपन्यांचे ब्रांड अम्बेसडर राहिले आहेत. सनी देओल यांनी एप्रिल 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. सनी देओल हे देओल कुटुंबातून भाजपमध्ये प्रवेश करणारी तिसरी व्यक्ती ठरले आहे. यापूर्वी त्यांचे वडील धर्मेंद्र आणि आई हेमामालिनी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आणि निवडणुका सुद्धा लढवल्या.

सनी देओल यांनी पंजाबच्या गुरुदासपूर येथून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. सनी देओल यांना दोन मुले आहेत. यातील एक अभिनय तर दूसरा डायरेक्शनमध्ये आपले नशीब अजमावत आहे. सनी देेओल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन : संजीव वेलणकर