खळबळजनक : लोखंडी सावरगाव परिसरातील विहिरीत मृतदेह आढळला…! 

टीम AM : लोखंडी सावरगावच्या पुढे केज रोडवर असलेल्या एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना आज समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासह पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यू नेमका कशामुळे झाला, हेही स्पष्ट झालेले नाही.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून मृतदेहाची ओळख आणि शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here