बर्दापूरमध्ये बेरोजगारीने घेतला मजुराचा बळी ; निराधार मुलीला आर्थिक मदतीची आस..!

टीम AM : बर्दापूर येथे बेरोजगारीच्या विवंचनेतून उत्तम सरवदे या मजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या पश्चात एक अविवाहित मुलगी असून, तिची आई दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन पावली आहे. मुलीला भाऊही नसल्याने वडिलांच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे एकटी पडली आहे.

आधीच आईचे छत्र हरपलेल्या या मुलीवर आता वडिलांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत तिच्या उदरनिर्वाहाचा आणि भविष्यातील प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मुलीला शासकीय योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच तिच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे. संकटात सापडलेल्या या निराधार मुलीला आधार देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here