नूडल्स खाऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ; ‌देशभरात खळबळ..!

टीम AM : ग्रेटर नोएडा परिसरामध्ये एक मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत गूढ घटना उघडकीस आली आहे. रात्री जेवणात नूडल्स खाऊन झोपलेल्या एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह सकाळी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेश हे आपल्या पत्नी ललिता आणि तीन मुलांसह राहत होते. गुरुवारी रात्री या कुटुंबाने नूडल्स बनवून खाल्ले आणि सर्वजण झोपी गेले. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील हालचाली न दिसल्यामुळे आणि बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता संपूर्ण कुटुंब बेडवर पडलेले दिसले. त्यांना जागे करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने स्वयंपाकघरातील चहाची भांडी, रात्री तयार केलेले नूडल्स आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी ताब्यात घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here