एसटी बसने कारला चिरडले ; भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू…!

टीम AM : माजलगाव – तेलगाव मार्गावरील पाथरूडजवळ हॉटेल शिवराज परिसरात आज दिनांक 18 आक्टोबर रविवार रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस क्रमांक MH-20-2740 आणि हुंडाई कार क्रमांक MH-26-AK-4210 यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कार बसच्या खाली घुसली.

मृत प्रवासी माजलगाव शहर व तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण आणि मृतांची नावे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here