टीम AM : निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराविरोधात ‘जंतरमंतर’ येथे आंदोलनासाठी निघालेले कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले.
मुंबईहून दिल्लीला पोहोचलेल्या विमानात पोलिसांचे पथक दाखल झाले आणि दीपके यांच्यासह त्यांचे सहकारी सौरव दास व आशुतोष रांका यांनाही ताब्यात घेतले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते; मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. या कारवाईमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.



