टीम AM : महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ए.एन.एम. द्वितीय वर्ष परीक्षेत शासकीय नर्सिंग कॉलेज, लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत शेख फिजा हिने 89.50 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, शेख हाजरा हिने 87.66 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर शेख तमन्ना हिने 86.50 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला तर 19 पैकी 13 विद्यार्थिनी विशेष प्रविण्यासह 80% हून अधिक गुणासह उत्तीर्ण झाल्या व उर्वरित 7 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि नावलौकिकाला आणखी भर पडली आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल डॉ. निलिमा सोनावणे, उपसंचालक (शुश्रुषा)आरोग्य सेवा, मुंबई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भांगे व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे विद्यार्थिनींची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



