लोखंडी सावरगाव – बर्दापूर फाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी : 104.49 कोटींचा निधी

आमदार धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश ; चौपदरीकरणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध

टीम AM  : बीड व लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 – बी वरील लोखंडी सावरगाव ते बर्दापूर फाटा (लातूर जिल्हा हद्द) या सुमारे 17.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून 104.49 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, कामाची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.

लोखंडी सावरगाव ते बर्दापूर फाटा हा मार्ग अरुंद असल्याने यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी वाहनचालक व नागरिकांची मागणी होती. आता या कामास मंजुरी मिळाल्याने प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून, वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here