टीम AM : अंबाजोगाई शहरातील पंचायत समितीसमोरील बांधकामावर स्लॅब भराईचे काम सुरू असताना 33 ‘केव्ही’ वीजवाहिनीला मशीनचा धक्का लागल्याने झालेल्या विजेच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये बबन चंद्रकात वाघमारे (वय – 50) आणि यशवंत कोंडिराम वाघमारे (वय – 33), रा. मंगळवार पेठ, (चांभार गल्ली) अंबाजोगाई यांचा समावेश आहे. स्लॅबची भराई मशीनच्या सहाय्याने सुरू असताना मशीनचा अचानक 33 ‘केव्ही’ वीजवाहिनीला संपर्क झाला. यावेळी दोन्ही कामगारांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. एकाच परिसरातील दोन कामगारांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने चांभार गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.



