राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा : 20 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा…!

टीम AM : राज्यातील अपुरा पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा दिला आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुमारे 55 लाख 70 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 20 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा करावेत आणि त्यांची खाती खुली करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सहकार विभागाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here