टीम AM : समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालंय. प्रतीक यांना तब्येत बिघडल्यानं लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचं निधन झालं आहे.
प्रतीक यांचं निधन हृदयविकाराच्या धक्क्याने किंवा ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नाहीय. शवविच्छेदनानंतरच नेमकं कारण समजू शकेल. चार डॉक्टरांचे पॅनेल शवविच्छेदन करणार आहे. प्रतीक यांच्या निधनाने लखनऊमध्ये शोककळा पसरली आहे.
38 वर्षीय प्रतीक यादवला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता आधीच मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं. गेल्या काही दिवसांपासून प्रतीकला अस्वस्थ वाटत होतं. काही दिवसांपूर्वी गंभीर अवस्थेत लखनऊतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशीही माहिती समोर येत आहे. तेव्हा 3 दिवस उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं होतं.
बुधवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडल्यानं सकाळी सहा वाजता सिव्हिल रुग्णालयात प्रतीकला आणलं. पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर काही वेळात त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रतीक मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा होता. प्रतीकची पत्नी अपर्णा यादव सध्या उत्तर प्रदेश राज्य महिला आय़ोगाच्या उपाध्यक्ष असून राजकारणात सक्रीय आहेत.



