‘व्हॅलेंटाईन डे’ : विद्यार्थ्यानं गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, शिक्षिकेची प्रतिक्रिया चर्चेत…व्हिडिओ व्हायरल….!

टीम AM : ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला सर्वांसमोर प्रपोज केलंय. या व्हिडीओमध्ये त्याच्या मित्रांचा गोंगाट, ‘Yes किंवा No’ अशी सततची मागणी आणि शिक्षिकेचं अनपेक्षित उत्तर यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी त्यांच्या भोवती उभे राहून मोबाईलवर शूटिंग करत आहेत. त्याचवेळी एक विद्यार्थी पुढे येऊन शिक्षिकेला प्रपोज करतो. आजूबाजूचे मित्र शिक्षिकेला उत्तर देण्यासाठी ओरडताना दिसतायत. काही वेळानंतर शिक्षिका हसत “Maybe” असं उत्तर देते. हे ऐकताच विद्यार्थ्याचे मित्र एकच जल्लोष करतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही.

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. काही सोशल मीडिया युजर्सनी याला धाडसी पण मजेशीर प्रकार म्हटलंय. तर अनेकांनी मात्र यावर आक्षेप घेत शिक्षकांविषयीचा आदर, शिस्त आणि वैयक्तिक मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. सोशल मीडिया ट्रेंड्स आणि व्हायरल कंटेंटच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांच्या वागणूकीत बदल होताना दिसतोय.

लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक मर्यादा ओलांडताना दिसतायत. अशा कृतींमुळे शिक्षक – विद्यार्थी नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात, असंही मत व्यक्त केलंय. दुसरीकडे, काही जणांच्या मते हा फक्त एक गमतीशीर भाग असू शकतो. त्यामुळे त्याचा अधिक अर्थ काढू नये. मात्र, शाळा किंवा कॉलेजच्या परिसरात कसं वागावं याबाबत स्पष्ट भान ठेवणं गरजेचं असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here