सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची लोकनेते सुनिल काका लोमटे यांच्या घरी सदिच्छा भेट : आठवणींना दिला उजाळा…!

टीम AM : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी लोकनेते सुनिल काका लोमटे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी आनंद शिंदे यांनी काकांच्या सामाजिक कार्याची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना आनंद शिंदे म्हणाले की, अंबाजोगाई शहरात सुनिल काका लोमटे दरवर्षी महाराष्ट्रातील एक नंबरची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असत. ‘मी कार्यक्रमासाठी येथे आलो असताना त्यांच्या शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन प्रत्यक्ष पाहिले आहे,” असे त्यांनी सांगितले.

पुढे शिंदे म्हणाले, ‘काकांचे कार्य अत्यंत मोठे होते. गोरगरीबांचा खरा पोशिंदा आज आपल्यातून गेला, याचे मला मनापासून दुःख आहे.’ यावेळी ॲड. शोभा लोमटे, कृष्णा लोमटे यांची‌ उपस्थिती होती. लोमटे परिवाराच्या वतीने सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे ‌यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान उपस्थितांनीही सुनिल काका लोमटे यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here