टीम AM : अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर मंदिराच्या पाठीमागील परिसरात भंगार दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू करत आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे अशी दुर्घटना घडत असल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे.



