नगरपरिषद निवडणूकीची आज मतमोजणी : अंबाजोगाईकरांचे निकालाकडे लक्ष…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीची आज मतमोजणी होणार असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई परिवर्तन जनविकास  आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्यात थेट लढत होत असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने दोन्ही आघाड्यांनी जोरदार प्रचार केला होता. आता मतमोजणीदरम्यान कोण बाजी मारणार, नगरपरिषदेची सत्ता कुणाच्या हाती जाणार आणि आगामी काळात शहराच्या विकासाची दिशा कोण ठरवणार, याकडे संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून निकाल जाहीर होईपर्यंत शहरात उत्सुकता आणि तणावपूर्ण वातावरण आहे.