मराठमोळी गिरीजा ओक ठरलीये नॅशनल क्रश, हॉलिवूडच्या अभिनेत्रींशी होतेय तुलना

टीम AM : गेल्या काही दिवसांपासून एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्क्रोल केलं तर तुम्हाला गिरीजा ओक नक्की दिसली असेल. मराठमोळी गिरीजा एक अवघ्या काही दिवसात नॅशनल क्रश ठरली. अनेकजण तर गिरीजाची तुलना अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इतालवी मॉडल मोनिका बेलुतीशी करीत आहेत. 

गिरीजाने मराठी चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. मात्र, हिंदी चित्रपट, नाटक, गुजराती नाटकं, जाहिराती यामध्ये गिरीजा आवर्जुन दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबाबत गिरीजाने सांगितलं, मी हैराण झालेय. 

गिरीजा ओकचं वैयक्तिक आयुष्य…

‘तारे जमीन पर’ या चित्रपटात अमिर खान सोबत गिरीजा ओकने काम केलं आहे. त्याशिवाय ‘जवान’ चित्रपटातही गिरीजा ओकने शाहरुखसोबत काम केलं आहे. त्याशिवाय गिरीजा ‘शोर इन द सिटी’ यातही झळकली. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ वेब सीरिजमध्येही गिरीजा मनोज वाजपेयीच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत होती. गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा ओक हिने सुह्रदय गोडबोले याच्याशी 2011 मध्ये लग्न केलं. सुह्रदय याचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक, अभिनेते, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here