‘सिटी स्कॅन’ मशीन सुरू करा : कोंडीराम पवार यांचे आमरण उपोषण, आजचा तिसरा दिवस

कोंडीराम पवार यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती

टीम AM : टायगर ग्रुपचे प्रमुख कोंडीराम पवार यांनी स्वा. रा.ती. रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’ मशीन तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे.

स्वा. रा. ती. रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’ मशीन गेल्या वर्षभरापासून बंद आहे, त्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पवार यांच्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि ‘सिटी स्कॅन’ मशीन लवकरात लवकर सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या उपोषणाबाबत स्वा. रा. ती. प्रशासन काय भूमिका घेते ? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here