टीम AM : दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रीलस्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे इत्यादी हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी ‘रीलस्टार’ चा ट्रेलर शेअर केला आहे.
‘रीलस्टार’ मध्ये नेमके काय पाहायला मिळेल ? याची झलक ट्रेलरमध्ये दाखवली गेलीय. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट ‘रीलस्टार’ च्या रूपात पाहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतायत. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



