ताडपत्री ते फ्लॅट : स्वप्नं खरी होतात, फक्त हार मानता कामा नये…!

टीम‌ AM : लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन गौरव मोरे याने आपल्या आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. फिल्टर पाडा सारख्या साध्या झोपडपट्टीत ताडपत्रीखाली जगण्यापासून ते आज ‘म्हाडा’ चं घर मिळेपर्यंतचा त्याचा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला आहे.

गौरवने सोशल मीडियावर भावुक होत सांगितलं की, ‘ताडपत्रीखालून आज मी फ्लॅटपर्यंत आलो. हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही, तर माझ्या संघर्षाचं, मेहनतीचं आणि चाहत्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.’ त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला ‘प्रेरणा देणारा कलाकार’ असं म्हटलं आहे. 

खरंच, छोट्या झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास आज  ‘म्हाडा’ च्या घरात स्थिरावतोय हीच त्याच्या मेहनतीची खरी कमाई आहे. गौरव मोरेच्या या कहाणीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, स्वप्नं खरी होतात, फक्त हार मानता कामा नये.