टीम AM : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले असून हे पद यंदा एससी (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता या पदासाठी इच्छुक महिला उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांनी आपले गणित मांडण्यास सुरुवात केली असून कोणत्या पक्षाकडून या पदासाठी उमेदवार दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद ‘एससी’ महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने बीडच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हे आहेत. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद ‘एससी’ महिला प्रवर्गासाठी राखीव ठरल्यानं, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात नवा रंग भरला जाणार आहे.



