वडवणीत तलावात उडी घेऊन तरुण डॉक्टरची आत्महत्या : देवळा गावावर शोककळा, वाचा…

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावचे सुपुत्र व वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले तरुण वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव (रा. देवळा) यांनी काल दिनांक 6 सप्टेंबर रोजी वडवणी येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देवळा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शुभम यादव हे वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते राहण्यासाठी बीड या ठिकाणी होते. काल सकाळी त्यांनी घरच्यांना ‘मी ड्युटीला जात आहे’, असे सांगून घर सोडले होते. परंतू, त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.  

डॉ. शुभम यादव यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तलावातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत‌, अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.