टीम AM : अंबाजोगाई शहरात आज सांयकाळी एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील रायगड नगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर [वय 35] या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत.



