टीम AM : राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जलजीवन मिशनचे काम करुनही वेळेत पैसे न मिळाल्याने एका तरुण कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडल्याने सरकारची तारांबळ होत आहे. अनेक कंत्राटदारांनी कामे पूर्ण करूनही त्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत, हे वास्तव आहे. अशाच एका कंत्राटदाराने शासन वेळेवर पैसे देत नसल्याचे सांगून आपले आयुष्य संपवले आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील (वय – 35) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्याने जीवन संपवले आहे.