टीम AM : अंबाजोगाई शहरातील सह्याद्री नगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी पोलीस अंमलदाराच्या घरातच चोरी करत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 19 जुलैच्या रात्री ते 20 जुलैच्या पहाटेच्या दरम्यान घडली.
बर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनील फड हे पत्नीसमवेत बाहेर गावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरासह किरायेदार तुकाराम फड यांच्या घरातही चोरी केली. या चोरीत दोन्ही घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या प्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास फौजदार आनंद शिंदे करत आहेत.